महिलेला बदनामीची धमकी देणाऱ्या युवकाला अटक : चार दिवसांची पोलीस कस्टडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा  :
 तालुक्यातील चुनाळा येथील एका विवाहीत महिलेला बदनामीची धमकी देवून तिच्यापासुन सोन्याची अंगठी लाटणा-या युवकांविरुध्द राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी एका युवकाला अटक केली असुन दुसरा आरोपी फरार आहे. 
चुनाळा येथील दोन युवकांनी गरबा खेळतांना एका विवाहीत महिलेची ओळखी करुन तिचा फोटो काढला आणि तिचा चेहरा कायम ठेवून दुस-या निर्वस्त्र महिलेचा शरीराचा भागाचा फोटो जोडून मोबाईलमध्ये फोटोशाँप द्वारे तयार केला. यानंतर या दोघांनी तिला ब्लकमेल करीत हा फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देवून पाच हजार रुपयांची मागणी केली. अत्यंत घाबरलेल्या या महिलेने या युवकांना जवळची सोन्याची अंगठी दिली व ही माहिती पतीला दिली. नंतर या महिलेने आपली अंगठी परत मागीतली असता अंगठी देण्यास नकार दिला. शेवटी या अन्यायग्रस्त महिलेने राजुरा पोलीसांकडे रितसर तक्रार दाखल केली. 
राजुरा पोलीसांनी आरोपी मयुर मुरलीधर निमकर व राहूल रागीट या दोन आरोपींविरुध्द भादंवि कलम ३५४(ड), ३८४,३८५ व ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपी मयुर निमकरला अटक केली. राजुरा न्यायालयाने या आरोपी युवकाची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दूसरा आरोपी फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रकरणाचा तपास ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-29


Related Photos