महत्वाच्या बातम्या

 राज्यात एक कोटी गाळप : १ हजार ९४ लाख क्विंटल साखर उत्पादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / सोलापूर : पहिल्या अंदाजापेक्षा अधिक गाळपाची शक्यता दिसल्याने सुधारित अंदाज जाहीर केला. मात्र, दोन्हीही अंदाजापेक्षा राज्यात अधिक ऊस गाळप झाले आहे. साखर कारखान्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार साखर आयुक्त कार्यालयाने ऑगस्ट महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा राज्यात एक कोटी ५ लाख मेट्रिक टन गाळप अधिक झाले आहे.
सरलेल्या पावसाळ्यात जेमतेम व कमी पावसाचा फटका यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन पावसाळ्यातही पुरेसे पाणी उसाला मिळाले नाही. पर्यायाने उसाची अपेक्षित वाढ झाली नाही.

त्यामुळे यंदा साखर कारखाने कमी सुरू होतील व गाळपही कमीच होईल असा साखर कारखाने व साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज होता. त्यामुळे साखर हंगाम सुरू होण्याअगोदर ऑगस्ट २०२३ मध्ये राज्यात ९२१ लाख मेट्रिक टन गाळप होईल व ८८.५८ लाख क्विंटल साखर तयार होईल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता.

नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने राज्याच्या बऱ्याच भागात उसाला पाणी मिळाले. आठवडाभर पाऊस व हवामानात चांगले राहिल्याने उसाची चांगलीच वाढ झाली. त्यामुळे साखर कारखानदारांना बळ आले.

त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयाने सुधारित ९४२ लाख मेट्रिक टन गाळप व ९२ लाख क्विंटल साखर तयार होईल, असा अंदाज जाहीर केला होता. मात्र, दोन्ही अंदाज फेल ठरवीत उच्चांकी गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत १ हजार ६७ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून १ हजार ९४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

२०७ पैकी २०१ कारखाने बंद -

- राज्यात हंगाम घेतलेल्या २०७ पैकी २०१ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. ५ ते ६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असून या महिनाअखेरपर्यंत हळूहळू हे कारखाने बंद होतील, असे सांगण्यात आले.
- सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेल्या ३६ पैकी ३५ साखर कारखाने बंद झाले आहेत. जिल्हात सुरुवातीला सव्वा लाख नंतर १३५ ते १४० लाख मेट्रिक टन गाळपाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, एक कोटी ६७ लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप झाले आहे. अंदाज चुकवीत ३७ लाख मेट्रिक टन गाळप जिल्ह्यात झाले आहे.
- राज्यात मराठवाड्यात विशेषतः धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता, सोलापूर व मराठवाडयातील जिल्ह्यांत ऊस गाळप वाढल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

गाळपासोबत उताराही वाढला -

राज्यात यंदाच्या हंगामात ऊस गाळप १ हजार ६७ लाख मेट्रिक टन, तर १ हजार ९४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने सुरुवातीला १० टक्के साखर उतारा पडेल असे गृहीत धरले होते प्रत्यक्षात १०.२५ टक्के इतका उतारा पडला आहे. मागील वर्षी २११ साखर कारखान्यात १ हजार ५३.७१ मेट्रिक टन गाळप व १ हजार ५२.३ लाख क्विंटल साखर तर १० टक्के उतारा पडला होता.





  Print






News - Rajy




Related Photos