युवकाचा संशयास्पद मृत्यु ?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
स्थानिक बिडकर वार्डातील  एका नवनिर्मित घराच्या संडासच्या टाकित आज सकाळी १० च्या सुमारास सागर ताराचंद मसराम ( २८) या युवकाचा मृतदेह आढळून आला.
 मृतक सागरचा भाऊ माजी न . प अध्यक्ष शाम मसराम यांनी पोलीसात दिलेल्या तकरारी नुसार ,सागर मसराम हा मिस्त्री काम करीत होता. दि.१४ ऑगस्टला सकाळी ९ वा. घरून कामावर जातो म्हणून निघाला.परतुं रात्री उशिरा पर्यत घरी न आल्याने घरच्यानी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागू शकला नाही.  आज सकाळी बिडकर लेआऊट येथे डॉ. पंकज भेंडे यांच्या नवनिर्माणाधिन बंगल्याचे काम सुरु आहे. या बंगल्यातील संडासच्या खुल्या टाक्यातील पाण्यात सागरचा मृतदेह आढळून आला. त्याच्या नातेवाईकानी तो ओळखला. सदर युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने मारहाण केल्याची मोठी जखम आढळून आली. सदर प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. शव विछेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्युचे कारण स्पष्ठ होईल असे पोलिसांनी सांगितले.  Print


News - Wardha | Posted : 2018-08-17


Related Photos