महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाणून घेतले कोडसेपल्ली येथील नागरिकांची समस्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील कोडसेपल्ली येथील नागरिकांचा समस्या जाणून घेण्यासाठी रात्री ठिक ११ वाजता आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी कोडसेपल्ली गावात पोहचले.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या, गली रस्ते, नालीसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले. असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले. तसेच त्यावेळी येणाऱ्या आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकी बाबत सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.

त्यावेळी चर्चा दरम्यान महिला वर्गांनी सांगितले की नवरात्री- बतकम्मा तथा शारदा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येते. या उत्सहात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी घेऊन DJ बॉक्स लावून सामूहिक नूत्य करतात. मात्र येथील डीजे सिस्टम उपलब्ध नसल्यामुळे नवरात्री उत्सहात मोठा अडचण निर्माण होते आहे म्हणून सांगितले. त्यावेळी अजय कंकडालवार यांनी म्हंटले की आपल्या महिला वर्गांना लवकरत लवकर डिजे सिस्टम उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच येथील प्रत्येक समस्या सोडवण्यात येईल, अशी कोडसेपल्ली ग्रामस्थांना आश्वासन दिले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, शैलेश कोंडागुर्ले, पुष्पा आत्राम, रमेश गावडे, मालू तलांडी, सुनीता आत्राम, भिमराव कुंभारे, राजू आत्राम, महेंद्र मडावी, बिजा तलांदी, सूरज तलांडी, राजू आत्राम, बाजीराव तलाडी, इरपा तलांडी, भगवान गोंगले, कारे वेलाडी, रमा आत्राम, मासा आत्राम, चिंना तलांडी, मालू आत्राम, सचीन पांचर्या, चिंटू सह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos