संगमनेरजवळ भरधाव कारची ट्रकला धडक, २ ठार, ४ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी
: संगमनेरजवळ भरधाव कारने ट्रकला दिलेल्या  धडकेत   दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारमधील सर्व प्रवासी हे नाशिकचे रहिवासी असल्याचे समजते.
संगमनेरजवळ पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव कारने  ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-01-18


Related Photos