महत्वाच्या बातम्या

 १० लाखांची मागणी, पाच लाख घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी सापळ्यात : ॲन्टी करप्शन ब्युरोची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : वनपरिक्षेत्र पेरमिली ता. अहेरी जि. गडचिरोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (वर्ग-२) प्रमोद आनंदराव जेनेकर (३८) वर्षे यांना ५ लाख आपयांची लाच स्विकारलेवरून ॲन्टी करप्शन व्युरो, गडचिरोलीच्या पथकाने काल ०४जानेवारी २०२४ रोजी रंगेहात पकडले.

यातील तक्रारदार यास मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरीता व ७२ लाख रूपयाची फाईन कमी करून ५ लाख रूपयापर्यंत फाईन करण्याकरीता आलोसे प्रमोद आनंदरात जेनेकर (३८), धंदा- नोकरी, पद- वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र पेरमिली ता. अहेरी जि. गडचिरोली यानी १० लाख रुपये लाचेबी मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन तकारी दिली.

पोलीस उपअधिक्षक अनामिका मिर्झापूरे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, ला.प्र.वि. गडचिरोली यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान प्रमोद आनंदराव जेनेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पेरामली ता. अहेरी यांनी तक्रारदार यास मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरीता व ७२ लाख रूपयाची फाईन कमी करून ५ लाख रुपयापर्यंत फाईन करण्याकरीता १० लाख रूपये लाचेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता बाम व भ्रष्ट मागाने तडजोडीअंती ५लाख रुपये लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने त्यांना रंगेहात पकडले, तसेच ऐमिली येथील आलोसे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाची घरझडती घेतली असता ८५ हजार रूपये रोख रक्कम मिळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे. प्रमोद आनंदराव जेनेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली यांचेविरूध्द उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, ॲन्टी करप्शन ब्युरो नागपुर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करपान ब्यूरो, नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अनामिका मिर्झापूरे, ॲन्टी करपान ब्युरो, गडचिरोली, पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले, सफौ सुनिल पेटट्टीवार, नापोशि किशोर जौजारकर, पोशि संदीप घोरमोडे, संदीप उडाण व हवालदार नरेश कस्तुरवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos