जि. प. उपाध्यक्षांनी केली गडअहेरी येथील कमी उंचीच्या पुलाची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील गडअहेरी येथील कमी उंचीच्या पुलाला अतिवृष्टीमूळे वारंवार येणाऱ्या पुराणे खड्डे पडले असून याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे . या पुलाला आज जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन पाहणी केली . 
सदर पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात असल्यामुळे  इंदाराम, देवलमारी गावांतील नागरिकांना, कर्मचाऱ्यांना अहेरीला जाण्याकरिता संड्रा मार्गाने प्रवास करावा लागत आहे. आज या पुलाला जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन पुलाची पाहणी केली . 
यावेळी गडअहेरी चे पोलीस पाटील गलबले ,जगदीश गुरु, दिलीपभाऊ तसेच गावकरी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-19


Related Photos