अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा : १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० यूनिट मोफत वीज देणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारचे अंतरिम बजेट सादर करत असून या बजेटदरम्यान त्यांनी मोफत वीज देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
रूफटॉप सोलर पॅनलच्या माध्यमातून सरकारकडून १ कोटी घरांना दरमहिन्याला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारकडून मत्स योजनेसह मोहरी आणि भुईमुगाच्या शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. तसंच कृषी क्षेत्रासाठी मॉडर्न स्टोरेज आणि सप्लाई चेनवर सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे. छोट्या शहरांना जोडण्यासाठी ५१७ नव्या मार्गांवर UDAN योजनेच्या अंतर्गत काम होणार आहे. सर्वांसाठी घर, पाणी आणि वीज यावर आमचा भर आहे, असा दावाही निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर करताना केला आहे.
दरम्यान, मागील १० वर्षांत २५ कोटी लोग गरिबी रेषेच्या वर आले. ८० कोटी लोकांना मोफत राशन देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसंच शेतमालाची किमान आधारभूत किंमत आमच्या सरकारने वाढवली, अशी माहितीही अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली आहे.
News - Rajy