महत्वाच्या बातम्या

 साखर कारखान्यांनी आपल्या कोट्यातील ९० टक्के साखर विक्री करणे बंधनकारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी २३ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा मंगळवारी जाहीर केला आहे. याच वेळी फेब्रुवारीसाठी जाहीर केलेल्या कोट्यातील शिल्लक साखर विक्रीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही.

देशार्तगत बाजारपेठेत प्रत्येक महिन्याला किती साखर विकायची याचा कोटा केंद्र सरकार जाहीर करते. तो साखर कारखानानिहाय असतो. फेब्रुवारी महिन्यासाठी २२ लाख टनांचा कोटा जाहीर करण्यात आला होता, आपल्या कोट्यातील किमान ९० टक्के साखर विक्री करण्याचे बंधन कारखान्यांवर आहे.

अनेक कारखान्यांना ते पाळता आलेले नाही. त्यामुळे या शिल्लक साखरेच्या कोट्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने केली आहे. मात्र, सरकारने यास नकार दिला आहे.

गेल्या मार्चपेक्षा दीड लाख टन जादा कोटा :
गेल्या वर्षी मार्च महिन्यासाठी २२ लाख टनांचा काटा होता. त्यापेक्षा हा कोटा दीड लाख टनांनी जादा आहे. याचा बाजारातील साखर दरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगतील सुत्रांचे म्हणणे आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos