नक्षली नेता सुधाकरन आणि त्याची पत्नी नीलिमा चे तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसमर्पण


वृत्तसंस्था / अमरावती  :  नक्षल चळवळीतील नेता  सुधाकरन आणि त्याची पत्नी नीलिमा यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पन केले आहे.  सुधाकरन याच्यावर १ कोटी आणि त्याची  पत्नी नीलिमा हिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षिस होते.  तेलंगाना पोलिसांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मात्र  तेलंगाना पोलिसांनी औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र झारखंड पोलिसांच्या  सूत्राच्या हवाल्यानुसार  नक्षलवाद्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी केवळ काही दिवसा पूर्वी तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
सुधाकरन, माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य, ओगु, सतवाजी, बुरायार, सुधाकर आणि किरण या इतर नावांनी ओळखले जातात. झारखंडमध्ये, या नक्षलवाद्यांनी तेंदूपत्ता ठेकेदारांकडून आणि कंत्राटदाराकडून खंडणीगोळा करून मोठी मालमत्ता जमविली आहे आणि आपला मित्र सत्यनारायणच्या माध्यमातून त्याने या पैशांना व्यवसायात गुंतवून ठेवले आहे. नक्षलवादी नेते अरविंद यांच्या मृत्यूनंतर झारखंड आणि छत्तीसगढ येथील नक्षलवादी संघटना या नेतृत्वाखाली कार्यरत होते.   Print


News - World | Posted : 2019-07-20


Related Photos