महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला आदिवासी समाजातील थोर हुतात्म्यांचे नाव द्या : माजी मंत्री वडेट्टीवार


- अन्यथा तिव्र आंदोलन : स्व. डिडोळकरांचा जिल्हयाच्या मातीशी संबंध काय?

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला सिनेट मंडळाच्या वतीने स्व. दत्ता डीडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव नुकताच पारित करण्यात आला. हा निर्णय म्हणजे आदिवासी समाजातील थोर हुतात्म्यांचा अवमान करणे असुन यामुळें आदिवासी समाजासह जिल्हयातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. आदिवासी संस्कृती जतन करण्याऐवजी तिला नामशेष करू पाहणाऱ्यांना प्रचंड जनआक्रोशाला सामोर जावे लागेल. तसेच सिनेट मंडळांनी घेतलेला तो ठराव तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू यांना पत्रकातून दिला आहे.

कुलगुरू यांना पाठविलेल्या पत्रानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या नामकरणावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाची संख्या, त्यांच्या समाजातील थोर हुतात्म्यांचे जन्म व कर्मभूमीसाठी बलिदान तसेच जिल्हयाला मिळालेली ओळख व संस्कृती याचा इत्यंभूत सर्वांगी विचार करून गोंडवाना विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. आदिवासी संस्कृतीने जिल्हयाला मिळालेली नाव, ओळख तसेच आदिवासी समाजातील थोर हुतात्मे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके तथा शहीद बिरसा मुंडा यांनी आपल्या जिवाची बाजी लावून स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारच्या विरोधात पुकारलेले बंड व दिलेला लढा यात वीरमरण पत्करून क्रांतीची मशाल पेटवून तरुणांना व देशातील क्रांतिकारकांमध्ये देश प्रेमाची चेतना जागविली. अशा थोर महात्म्यांच्या बलिदान व त्यागाचा वारसा यांना बगल देऊन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट मंडळाने १७  जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, कृषी इत्यादींपैकी कुठल्याही चळवळीत कोसोदुर पर्यंत संबंध नसलेल्या तसेच जिल्ह्याच्या मातीशी कुठलीही नाळ, व नाव ओळख अथवा तीळ मात्र ही संबंध नसलेल्या स्वर्गीय दत्ता डीडोळकर यांचे नाव गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला देण्याचा ठराव पारित केला आहे. सदर ठराव हा आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याऐवजी आदिवासी समाजाच्या भावना दुखावनारा व आदिवासीं संस्कृतीला नामशेष करण्याचे षडयंत्र आहे. स्व. डीडोळकर यांच्या नावाचा पारित करण्यात आलेला ठराव पुढील सिनेट बैठकीत कायम न करता तो रद्द करून विद्यापीठाच्या सभागृहाला आदिवासी समाजातील थोर हुतात्मे यांचे नाव द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू यांना पत्रातून कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos