शेतकऱ्यांचे हित जोपासणारी कृषी प्रदर्शनी : खासदार अशोक नेते


- चंद्रपुर येथील चांदा अँग्रो- २०२४ भव्य कृषी प्रदर्शनी महोत्सवाला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपुर : शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी चांदा अँग्रो २०२४ कृषी महोत्सव, पशु प्रदर्शनी, चर्चासत्रे, बचतगट व दालने अशा विविध भव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, चंद्रपूर महाराष्ट्र शासन यांच्या वतीने चांदा क्लब मैदान चंद्रपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
चांदा अँग्रो भव्य कृषी प्रदर्शनी या महोत्सवाला खासदार अशोक नेते उपस्थितीत राहुन मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, कृषी महोत्सव प्रदर्शनी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन, परिचर्चा व परिसंवाद मिळते. यासाठी अशा प्रदर्शनीचे आयोजन करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासन कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत.
कृषी क्षेत्राच्या विकासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, सौर कृषी पंप योजना, कृषी अभियांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, किसान क्रेडिट कार्ड, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर अशा विविध योजना केंद्र शासनाने कार्यान्वित करून अमलांत आणले आहेत.
अशा भव्य कृषी प्रदर्शनीच या ठिकाणी आयोजन केले नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. या कृषी प्रदर्शनीचा लाभ संपूर्ण शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी या प्रदर्शनीत कृषी विभागाचे अधिकारी यांनी खासदार अशोक नेते यांचे पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, कृषी अधिकारी वर्ग, तसेच मोठ्या संख्येने प्रदर्शनी ला शेतकरी बांधव उपस्थित होते.
News - Chandrapur