महत्वाच्या बातम्या

 युवकांच्या रोजगारासाठी प्रफुल पटेल सदैव प्रयत्नशील : माजी आमदार राजेंद्र जैन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गोंदिया : मनोहर पटेल यांनी लावलेला गोंदिया शिक्षण संस्थेचा वृक्ष आता वटवृक्ष झाला आहे. प्रफुल पटेल हे वडील मनोहर पटेल यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाच्या अनेक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी राजकारण ही खूप केलं. परंतु शिक्षण क्षेत्र आणि त्यातून विद्यार्थी हिताचा ध्यास कधी सोडला नाही. शिक्षणाचे दायित्व प्रफुल पटेल यांच्या परिवाराने स्वीकारले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रफुल पटेल सदैव कार्यरत आहेत, असे प्रतिपादन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसा निमित्ताने येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात नोकरी, रोजगार मिळविण्याची तयारी, यावर आयोजित कार्यशाळेत राजेंद्र जैन बोलत होते. यावेळी  गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल जैन, मार्गदर्शक म्हणून ओनप्रेप प्रायव्हेट लिमिटेडचे आशिष दिवाण, पल्लवी वैध, अशोक सहारे, मनोहर वालदे, झलक बिसेन, विनीत शहारे, प्राचार्या डॉ. शारदा महाजन उपस्थित होते. राजेंद्र जैन पुढे म्हणाले, प्रफुल पटेल यांनी गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित महाविद्यालयाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य निरंतर सुरु आहे.

विध्यार्थ्यानी शिक्षणाच्या मंदिरात येताना भावना, लक्ष्य, निश्चय निश्चित केले तर यशाच्या  उंचीवर पोहोचणे कठीण नाही. विश्वास आणि निष्ठेने कार्य केले तर यश हमखास मिळते, असेही आमदार जैन यांनी सांगितले. मार्गदर्शन करताना ओनप्रेप प्रायव्हेट लिमिटेडचे आशिष दिवाण यांनी कालबाह्य बाबींची जग किंमत करीत नाही त्यामुळे मोबाईल प्रमाणे स्वतःला बदलत राहण्याचा सल्ला विध्यार्थ्यांना दिला. पडा, उठा स्वतः शिका किंवा दुसऱ्यांकडून शिका, हे दोनच मार्ग शिकण्याचे आहेत असे सांगत दिवाण यांनी विध्यार्थांशी संवाद साधत खेळीमेळीच्या वातावरणात रोजगार मिळविण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सोच सेवा संस्थानच्या संयुक्त विध्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मनोहर पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजेंद्र जैन यांच्या हस्ते केक कापण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कृतिका वर्मा आणि दिव्या शरणागत यांनी तर आभार डॉ. मुनेश ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. भावेश जसानी, डॉ. गिरीश कुदळे, डॉ.मुनेश ठाकरे, डॉ.अश्विनी दलाल, प्रा.योगेश भोयर, डॉ. विराज वेलतुरकर, डॉ.अंबादास बाकरे, डॉ. आर. सी. मोहतुरे, डॉ.खुशबू होत चंदानी, प्रा.उर्विल पटेल, डॉ. सुयोग इंगळे, डॉ. कपिल चौहान, डॉ. सुनिल जाधव, डॉ.राकेश खंडेलवाल, डॉ.अर्चना जैन, डॉ. शफीउल्ला खान यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gondia




Related Photos