पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन : भारताचा एक जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान हडबडला असून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्य्यआतील नौशेरा सेक्टरमध्ये आज, शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैन्याने पहाटे साडेसहा वाजता नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार करून उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराने जशास तसे प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकच्या हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. 
शहीद झालेल्या जवानाचे नाव संदीप थापा (३५)  रा. डेहराडून असे आहे. ते लान्स नायक होते. गेल्या १५ वर्षापासून ते लष्करीसेवेत कार्यरत आहेत. आज, पाकने गेलेल्या गोळीबारीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाककडून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला गोळीबार दुपारपर्यंत सुरूच होता. पाकच्या गोळीबारला भारतीय लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. सीमेलगतची पाकिस्तानी लष्कराची चौकी भारताने उडवली अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.   Print


News - World | Posted : 2019-08-17


Related Photos