महत्वाच्या बातम्या

 उप पोलीस स्टेशन कसनसुर येथे सीआरपीएफ १९२ बटालियन तसेच गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मेळावा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : उप. पोलिस ठाणे कसनसुर येथे कार्यरत असलेली केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल १९२ कंपनी तसेच गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या वतीने पोलिस अधिक्षक निलोत्पल यतीश देशमुख, (अपर पो. अधीक्षक अभियान) चिंता, (अपर पो. अधीक्षक प्रशासन), एम. रमेश (पोलीस अधीक्षक,अहेरी) यांच्या संकल्पनेतून उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन कसनसुर येथे भव्य जनजागरण मेळावा आयोजन करण्यात आले.   

सदर भव्य जनजागरण मेळाव्याला अध्यक्ष सीआरपीएफ बटालियन १९२ चे डेप्युटी कमांडंट महेंद्र यादव, असिस्टंट  कमांडट सुनीलकुमार पोलिस निरीक्षक राकेश कुमार, जी.आर. सोनवणे, डी.डी.सी. बँक मॅनेजर कसनसुर, ग्रामीण रुग्णालय कसनसुर च्या मेश्राम, सरपंच, कमल हेडो, कसनसुरचे गावं पाटील रेजी मडावी, पंचायत समिती माजी सभापती बबिता, परी पोउपनि रोहित जाधव यांच्या प्रमूख उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे  पूजन व पुष्पहार अर्पण करून भव्य जनजागरण मेळाव्याची सुरवात करण्यात आली. 

प्रभारी अधिकारी धिरसिंग वसावे यांनी प्रास्ताविक करून सदर मेळाव्याचा उद्देश व पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. असिस्टंट कमांडंट महेंद्र यादव यांनी खेळाचे महत्त्व तसेच होणारे फायदे  ह्याविषयी  मा्गदर्शन केले तसेच त्याचे सुनीलकुमार साहेब यांनी आदिवासी लोकांनां मिळणारे शैक्षणिक तसेच आर्थिक सवलती बाबत माहिती दिली, तसेच नमूद जनजागरण मेळाव्यात विएलएफ मार्फत खालील योजनांचा लाभ देण्यात आला.

१) आयुष्मान भारत कार्ड -०५
२) ई-श्रम कार्ड - ०३
३) पॅन कार्ड नोंदणी -०२
४) उत्पन्न प्रमाणपत्र-०१
५) उज्वल. गॅस योजना जोडणी -०४
६) आधार कार्ड - ०४

अशा प्रकारे वरील योजनांचा लाभ देण्यात आला. सदर जनजागरण मेळावा उप पोलीस स्टेशन कसनसुर हद्दीतील  २५० ते ३०० नागरीक उपस्थित होते. उपस्थित नागरीकांना  सीआरपीएफ तसेच उप पोलिस स्टेशन कसनसुर यांच्याकडून क्रीडा साहित्य ज्यात क्रिकेट किट, होलीबॉल किट, कॅरम किट, तसेच महिलांना साड्या कपडे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक नागरिकाला झाडाचे रोप ही देण्यात आले उपस्थित नागरिकांना जेवणाची व्यवस्था करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा पोलीस, सीआरपीएफ अधिकारी /अंमलदार तसेच एसआरपीएफ अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर जनजागरण मेळावा सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक बाबुलाल बोरसे यांनी केले.         





  Print






News - Gadchiroli




Related Photos