महत्वाच्या बातम्या

 लोधी समाजाच्या प्रतिनिधींच्या हस्ते आ. विनोद अग्रवाल यांचा सत्कार


- आ. विनोद अग्रवाल यानी राज्यातील लोधी समाज केंद्राच्या यादीत ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची केली होती मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. यामध्ये सर्वात ज्वलंत विषय जातीय आरक्षण आणि तफावत असल्याबाबतचा होता. महाराष्ट्रातील काही विशिष्ट जाती ओबीसी प्रवर्गात मोडतात परंतु केंद्राच्या सूचीनुसार त्याच जाती ओबीसी प्रवर्गात मोडत नाही. त्यामुळे अनेक शासकीय आरक्षणापासून त्या समाजाला वंचित राहावे लागते. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संखेत असलेला लोधी समाज सुद्धा अश्याच केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे सदैव केंद्राच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. यावर राज्य शासनाचे लक्ष केंद्रित करताना आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लोधी समाजाला केंद्राच्या सूचित ओबीसी प्रवर्गात जोडण्याची मागणी केली.

त्यांच्या या कार्यामुळे जिल्ह्यातील लोधी समाजातील नागरिक अत्यंत आनंदी असून आमदार विनोद अग्रवाल यांचा आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे जावून त्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. लोधी समाजाचे प्रतिनिधी यांना एवढ्या वर्षापासून प्रलंबित आणि दुर्लक्षित असलेल्या मुद्यावर शासनाचे लक्ष केंद्रित करून दिल्या बद्दल आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले आहे. यावर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सदर विषय मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आमदार अग्रवाल यांनी आश्वासन सुद्धा दिले.





  Print






News - Gondia




Related Photos