वडसा येथे भाजपाची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न
- विविध ठराव पारीत, विविध मुद्यावर चर्चा, सरल ॲपचे प्रशिक्षण, नविन लोकांचे भाजपात प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक १४ फेब्रुवारी २०२३ ला सिंधी भवन, देसाईगंज येथे पार पडली.
या बैठकीला मंचावर प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, ज्येष्ठ नेते तथा सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपा एस.टी मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस, प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री संघटन रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगिता पिपरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा उपस्थित होते.
जिल्हा बैठकीत जी-२० विषय प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, मण की बात रवि ओल्लालवार जिल्हा संघटन सरचिटणीस, महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन ठराव धन्यवाद मोदी मोतीलाल कुटरेजा, नव मतदार नोंदणी रमेश भुरसे, प्रदेश सदस्य युवा वाँरीयर्स चांगदेव जी फाये, बजेट गाहाणे, राजकीय ठराव प्रशांत वाघरे, क्रुषी विषयक ठराव रमेश बारसागडे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे समारोप प्रकाश सावकार पोरेड्डीवार, किसन नागदेवे भाजपा जिल्हा अध्यक्ष गडचिरोली यानी केले. बैठकीचे संचालन जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यानी केले.
News - Gadchiroli