महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मृतकाच्या कुटुंबास केली आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील रामयापेठा येथील रहिवासी दुलसा मासा मडावी याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.

मृतकाच्या मागे मोठा परिवार असल्याने घरचा करता पुरुषाचा मृत्यू झाल्याने त्या कुटुंबाला आर्थिक संकट आपले होते. मृतकाची पत्नी जिज्या दुलसा मडावी हिला समोर खर्चासाठी अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत करण्यात आले. त्यावेळी अजय कंकडालवार म्हणले की समोर आणखी अडचण भासल्यास मला कळवा असा धीर त्यांनी कुटुंबियांना दिले. त्यावेळी मडावी परिवारातील सदस्यांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी उपस्थित संतोष रामय्या वसाके, दलसू देवू मडावी, प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्लीसह मडावी परिवारातील सदस्य तसेच आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos