महत्वाच्या बातम्या

 माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाचा मोठा दिलासा : अटकपूर्व जामिन मंजूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना दापोली रिसॉर्ट प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. खेड सत्र न्यायालयाने अनिल परब यांना अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दापोलीच्या साई रिसॉर्टमधल्या कथित घोटाळ्यात परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करत परबांना हा रिसॉर्ट बांधल्याचा आरोप आहे. त्यामुळे परब यांच्यासह तिघांविरोधात कलम 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीच्या गटविकास अधिकारी रुपा दिघे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.  माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांवर आयपीएस कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. अनिल परब हे माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. 2012 पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

अनिल परब यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेतजमीनीवर तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. शेतजमिनीचे बिगर शेती जमिनीत रुपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अनिल परब यांनी हे रिसॉर्ट आपले नाही, असे अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने परब यांना मोठा दिलासा दिला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos