सासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
राहाता तालुक्यातील केलवड येथे एका चुलत सासर्‍याने आपल्या सुनेकडे शरीर सुखाची मागणी केली. सुनेने नकार दिल्याने चिडलेल्या सासर्‍याने तिच्यावर कुर्‍हाडीने वार केले  त्यानंतर स्वतः विष प्राशन करून विहिरीत ऊडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तर सून आणि गुन्हेगार सासर्‍याला दवाखान्यात  दाखल केले असून उपचार सुरू आहेत. 
राहाता तालुक्यात केलवड येथील बाळासाहेब गोर्डे, त्यांची पत्नी  , दोन मुले व आई हे गोर्डे वस्तीवर राहतात. बाळासाहेब गोर्डे हे कामासाठी  बाहेर गेले होते, तर गोर्डे यांची आई बाहेर होती व मुले शाळेत गेली होती. घरी कोणी नसताना गोर्डे यांचे चुलत काका नाना गोर्डे हे बाळासाहेब गोर्डेंच्या घरी आले आणि सुनेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने  प्रतिकार केल्याने चिडलेल्या नाना गोर्डे याने कुर्‍हाडीने तिच्यावर वार केले. त्यात महिला हि गंभीर जखमी झाल्याने नाना गोर्डे याने घटना स्थळावरुन पळ काढत स्वतःच्या मालकीच्या विहरीत विष पिउन आत्महत्येचा प्रयत्न केला. आनिता व नाना यांना  खाजगी दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी नाना गोर्डेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. नाना गोर्डे याने याआधीही सुनेकडे कडे शरीरसुखाची मागणी केली होती, परंतु तिने नकार देत आपल्या पतीकडे तक्रार केली होती. तेव्हा बाळासाहेब गोर्डे यांनी नाना गोर्डेला समज दिली होती नाना याने त्या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने हि विपरीत घटना घडली.

   Print


News - Rajy | Posted : 2018-10-09


Related Photos