बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंतबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राखी सावंतला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले आहे. शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केले जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शर्लिन चोप्राने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
शर्लिन चोप्राने ट्विट करत अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याचं सांगितले आहे. सोबतच शर्लिन चोप्राने आपल्या एफआरआयबाबत अतिरिक्त माहितीसुद्धा नमूद केली आहे. नुकतेच समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, राखी सावंतने शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याने शर्लिन चोप्राने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यासाठी तिला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.
राखी सावंतचा अटकपूर्व जामीन काल मुंबई सेशन कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानुसार अंबोली पोलिसांनी आज राखी सावंतला अटक केली आहे.
News - Rajy