माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल सामान्यांचे उदघाटन संपन्न
- जय पेरसापेन क्लब काटेपल्ली यांच्या वतीने आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामान्यांचे उद्घाटन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. अहेरी तालुक्यातील काटेपल्ली येथे जय पेरसापेन क्लब काटेपल्ली यांच्या वतीने आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामान्यांच्या उदघाटन प्रसंगी उदघाटन स्थानावरून बोलत होते, ते बोलताना म्हणाले आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल क्रिकेट, कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत. प्रत्येक ठिकाणी माझ्या स्वतः कडून पारितोषिक देत असताना माझा एकच उद्देश्य आहे.
युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगले खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो. हे होत असताना गावातीला सामाजिक, शैक्षणिक, व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले. या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार 21001 हजार रुपये, दितीय 15001 हजार रुपये , तर तृतीय 10001 हजार रुपये, याठिकानी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश लेकूर ग्राम पंचायत सदस्य देवलमारी तर कार्यक्रमाचे विशेष अथिती हरीश गावळे उपसरपंच ग्राम पंचायत देवलमारी, ईस्पत गावळे माजी सरपंच देवलमारी, विलास आत्राम, नागेश आत्राम, सुरेश आत्राम, संदीप दुर्गे, विलास आत्राम, लालशाय आत्राम, दुर्गुबाई आत्राम, सुरेश आत्राम, वैकटेश चालूरकर, महेश झाडे, नरेंद्र गर्गम प्रकाश दुर्गे, राकेश साडमेक तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.
जय पेरसापेन क्लब काटेपल्ली यांच्या वतीने आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामान्यांच्याचे अध्यक्ष मिथुन आत्राम, उपाध्यक्ष विशाल आत्राम , सचिव महेश आत्राम सहसचिव अरुण मडावी कोषाअध्यक्ष विशाल आत्राम, क्रीडाप्रमुख संतोष सडमेक इत्यादी मंडळगण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग प्रयत्नशिल होते.
News - Gadchiroli