राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रात ४ ग्रामपंचायतीत भाजपाचा दणदणीत विजय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली लडविलेल्या 7 पैकी 4 ग्रामपंचायतीत भाजपा पैनलचा दणदणीत विजय झाला आहे.
अहेरी तालुक्यातील किष्टापुर दौड, एटापल्ली तालुक्यातील तोडसा तसेच सिरोंचा तालुक्यातील बेज्जूपल्ली आणि मादारम ह्या 4 ग्रामपंचायतीत भारतीय जनता पार्टी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे, राजमहाल अहेरी येथे सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे राजे यांनी पुष्पहार घालून त्यांना मिठाई देत सर्वांचे अभिनंदन केले.
News - Gadchiroli