स्वीप अंतर्गत गडचिरोली येथे रॅली व पथनाट्यातून मतदार जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  शासकीय आदिवासी मुला - मुलींचे वसतीगृह  गडचिरोली तर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीला वसतीगृहातून सहा. जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड (भा.प्र.से)   यांच्या शुभ हस्ते व सहा. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात आला. 
या रॅलीमधून नागरीकांना विविध घोष वाक्यांमधून मतदान, मतदार विषयक माहिती देण्यात आली. गडचिरोली मतदार संघातील नागरीकांना मतदानाविषयक लक्ष वेधन्यासाठी व त्यांना आवश्यक माहिती देण्यासाठी स्वीप या मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत रॅलीमधून माहिती दिली. यावेळी स्वीप समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ उपस्थित होते.
मतदार जनजागृती रॅली शासकिय आदिवासी मुलांचे वसतीगृह ते इंदिरा चौक पर्यंत काढल्यानंतर इंदिरा चौकामध्ये मतदार जनजागृतीवर आधारीत पथनाट्य सादर करण्यात आले.  उपस्थित नागरीकांना मतदानाची शपथही यावेळी देण्यात आली. पथनाटयामध्ये निवडणुक प्रक्रिया व मतदान करण्याबाबत सुंदर नाटक मुलांच्या वसतिगृहातील चमुने सादर केले. यावेळी नागरीकांचा व मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांना यावेळी मतदान करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करून सहकार्य केले पाहिजे. यावेळी रॅलीला सप्रअ अनिल सोमनकर,  कशिविअ  भिवगडे , रविंद्र गजभिये, पंकज ढवळे, गृहपाल स्वाती पांडे , मुकेश गेडाम, प्रियंका कोवे, सुप्रिया तुलावी, भुपेंद्र गेडाम, अक्षय आत्राम आदिंनी सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-29


Related Photos