महत्वाच्या बातम्या

 बाल विवाहाला प्रतिबंधासाठी प्रशासनाचे कडक पाऊल


- प्रिंटीग प्रेस चालक, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, मंगल कार्यालय व्यवस्थापकांवरही होवू शकते कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : बाल विवाहाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. त्यामध्ये विवाह योग्य वय झाल्याची खातरजमा न करता बाल विवाह समारंभास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व लग्न पत्रीका छपाई करणारे प्रिंटीग प्रेस चालक, मंडप डेकोरेशन चालक, फोटोग्राफर, आचारी, मंगल कार्यालय / लॉन, सभागृह व्यवस्थापक, बॅन्ड वादक, कॅटरींग चालक, विविध जाती धर्मातील लावण्यात येणारे श्रद्धास्थाने, व इतर यांनी विवाह समारंभाची बुकींग/ कार्य घेतांना मुलाच्या तसेच मुलीच्या विवाहाकरीता ची वय पुर्ण (मुलीचे  वय 18 वर्ष वय व मुलाचे वय 21 वर्ष पुर्ण) झाल्याची खातरजमा करुनच होणाऱ्या विवाह संबंधित कामाची बुकींग घेणे बंधनकारक राहील.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार अठरा वर्षाखालील मुलगी व एकवीस वर्षाखालील मुलगा यांचा जो कोणी बाल विवाह विधीपुर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपुर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसुर करेल यामध्ये बाल विवाहास उपस्थित  राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती कारावास व एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे. 

बाल विवाह प्रतिबंध अधिनियमान्वये विवाह करिता वधूचे वय 18 वर्षे तर वराचे वय 21 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे. तरीही लग्ना करिता निर्धारित असलेले वय पूर्ण न करताच मुलांची लग्न केल्यास तो विवाह बालविवाह ठरतो. झालेला विवाह हा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार विवाहास उपस्थित असणारे तसेच विवाहास सहकार्य करणारे सर्व आस्थापना चालक व लग्न लावुन देणारे संबंधित धर्माचे व्यक्ती  यांचे विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. 

बालविवाह प्रतिबंध करणेकरीता शासनाने ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांची बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणुन नेमणुक केली आहे. जिल्हयात होणारे बालविवाह प्रतिबंध करणेकरीता बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी तसेच मुख्याधिकारी नगरपरीषद / नगरपंचायत यांनी  त्यांचे कार्यक्षेत्रात विवाह समारंभ / सोहळयास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱे सर्व आस्थापना चालक यांची बालविवाह प्रतिबंध अधिनियम  कायद्याची अमंलबजावणी करणेकरीता बैठक घेवुन त्यासंबधातील अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, पहीला माळा भु- विकास बँकेच्या वर, बस स्थानकाजवळ भंडारा यांच्याकडे सादर करावा, असे लेखी आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्गमीत केले आहे. 





  Print






News - Bhandara




Related Photos