महत्वाच्या बातम्या

 पोलिस दल कोठी व गाव सहयोगातून रस्ता दुरुस्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पिडमिली नाल्याजवळ कोठी ते भामरागड रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे कोठी येथे येणारी बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोठी येथून भामराकडे येथे - जाण्यासाठी कोठी, मरकणार, तोयनार, तुमरकोडी, मुरूमभुशी या व इतर गावातील  नागरिक, महिला तसेच विद्यार्थी यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. सदरची समस्या दूर करणे बाबत कोठी येथील गावपाटील व नागरिकांनी पोलीस मदत केंद्र कोठी चे प्रभारी अधिकारी संजय झराड यांना विनंती केली. प्रभारी अधिकारी यांनी पीएसआय वाघ, पीएसआय माने यांच्याशी विचार विनिमय करून उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्याशी संपर्क साधून सदर समस्या मांडली असता उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी आवश्यक ती मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. 

आज 14 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस अधीक्षक पोलीस अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक समिर सेख, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र कोठी व कोठी गावातील नागरिक यांच्या संयुक्त परिश्रमातून रस्ता दुरुस्त करून निर्मान झालेली समस्या सोडवली आहे. तसेच पिडमिली गावातील नागरिकांनाही हलवेर ते पिडमली दरम्यान नुकसान झालेल्या रस्त्याचे दुरुस्ती करण्यात बाबत आव्हान केले असता त्यांनी ही श्रमदानातून सदरचा रस्ता दुरुस्तीचे काम उत्तमरीत्या केले आहे. रस्ता दुरुस्त झाल्याने बंद असलेली बस सेवा पूर्ववत सुरू करणे बाबत आगार प्रमुख अहेरी (राज्य परिवहन महामंडळ) यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

बंद झालेली बस सेवा पूर्ववत सुरू होण्याबाबत आशा पल्लवी झाल्याने समस्त नागरिकांनी पोलीस दला बाबत आभार व्यक्त केले.

सदर कामासाठी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना चहा,नाश्त्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली यासाठी पोलीस मदत केंद्र कोठीचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

  Print


News - Gadchiroli
Related Photos