महावितरणचा १९४७ वीजचोरांना दणका


-१४ महिण्यात ४ कोटी ५० लाखांच्या वीजचोऱ्या  उघडकिस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
 महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात अंतर्गत एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीजचोरी विरूध्द विविध मोहिमा राबविण्यात आल्या, या मोहिमांत चंद्रपूर व गडचिरेाली मंडलात एकंदरीत १९४७ वीजचोऱ्या  पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी  एकंदरीत ४ कोटी ५० लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकिस आले आहे. यात ५९८ वीजचेार हे आकडेबहाद्र तर १३४९ वीजग्राहकांनी वीजेच्या मीटर्सशी  छेडछाड करून वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. ६५ वीजचोरां विरोधात   पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्व वीजचेारांनी एकंदरीत ४३ लाख ८८ हजार ८१७ युनिटस वीजचेारी केली.                   
 वरोरा विभागात २२ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व ११३ वीजमीटरर्सशी  छेडछाड करणारे, बल्लारशः  विभागात ४९ आकडा टाकूण वीज चोरणारे व २६४ वीजमीटरशी  छेडछाड करणारे, गडचिरोली विभागात १७६ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहादूर व १४० वीजमीटरशी  छेडछाड करणारे, ब्रम्हपुरी विभागात २५९ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व १६८ वीजमीटरशी  छेडछाड करणारे तर  आलापल्ली विभागात ६७ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व १६० वीजमीटरशी  छेडछाड करणारे व चंद्रपूर विभागात २५ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व ५०४ वीजमीटरशी छेडछाड करणारे असे एकंदरीत १९४७ वीजचेार या कारवाईत सापडले.  या सर्व वीजचोरांविरोधात  वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 
 वीजेच्या मीटर्समध्ये छेडछाड करण्यात आलेल्या वीजचोरीच्या प्रकांरामध्ये ,वीजचोरांनी मीटरमध्ये एक्स-रे पट्टी टाकूण मीटर थांबविणे, रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे सर्किट मध्ये फेरफार करणे आदी प्रकार उघडकिस आले आहेत. 
 अधिक्षक अभियंता तसेच चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा , आलापल्ली, गडचिरोली, ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या उपविभागिय व शाखा अभियंता तसेच सहकाऱ्यांसोबत  पार पाडली. वीजचोरी एक सामाजिक अपराध असून वीजचोरी करून कोळस्यासारख्या सिमित संसाधनापासून तयार होणारी वीज  चोरून चीजचोर देषाच्या संपत्तीवरच घाला घालत असतात.  त्यामुळे वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर  मार्गाने वीज वापरण्याचे  तसेच वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता  अरविंद भादिकर यांनी   केले आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-08-18


Related Photos