वासाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 'लेक वाचवा लेक शिकवा' अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
प्रहार जनशक्ती पक्ष आरमोरी व शाळा व्यवस्थापन समिती जि.प.ऊच्च प्राथमिक शाळा वासाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने ७ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता  “ लेक वाचवा, लेक शिकवा “  रॅलीचे चे आयोजन करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्येची देवता सावित्री आई फुले यांच्या प्रतिमेला उद्घाटक वासाळा येथील वासाळा ग्रामपंचायतचे सरपंच ओमप्रकाश जोंजालकर,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुष्पाताई धंदरे व मुख्याध्यापिका मैन्द मॅडम यांच्या हस्ते हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी त्यांनी  “ लेक वाचवा लेक शिकवा “ व  “ मुली जन्मविषयी, व स्त्री ” चे महत्व पटवून दिले. 
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष इंजि. अक्षय बाळाजी बोरकर, आरमोरी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष रिंकू झरकर, आरमोरी तालुका उपाध्यक्ष मोसम मैन्द, ग्रामपंचायत वासाळा उपसरपंच बायजाबाई मेश्राम, दर्रो मॅडम, गजबिये मॅडम, शशिकलाताई डोंगरवार, छायाताई उइके, योगाजी रामटेके, विठोबाजी भोयर, विकास धंदरे, तारकेश धंदरे, सुनील धकाते, उमेश झरकर, कुंदन कुमरे, प्रशांत धकाते, सुभाश आखाडे, व्यंकटेश धंदरे, प्रकाश धकाते, रविंद्र सेलोटे, अनिल वाघरे, प्रफुल आखाडे, निकेश सहारे, विकास बोरकर, निकेश पिंपरखेडे, व्यंकटेश धंदरे, आरमोरी प्रहार शहर प्रमुख प्रवीण सेलोकर, विवेक ठाकरे, राहुल चौधरी, ताजू त्रिकोलवार, ओम सहारे, संजय मेश्राम, पंकज मेश्राम, गुरु वाटगुरे, महेश दुमाणे, गोलू निखारे, यश काळबांधे, मिथुन शेबे, रेहाण शेख,  तसेच बहुसंखेने विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहार जनशक्ती पक्षाचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष इंजि. अक्षय बाळाजी बोरकर यांनी केले तर आभार कोडाप यांनी मानले केले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-08


Related Photos