महत्वाच्या बातम्या

 गांधीनगरच्या पहिल्या सरपंच होण्याचा मान महिलेला


- पहिल्यांदाच होत आहे निवडणूक 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यात २० पैकी १६ ग्रामपंचायतीच्या आटोपल्या होत्या. मात्र सावंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर येथील नागरिकांनी गांधीनगर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा यासाठी निवडणुकावर बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे नागरिकांपुढे शासनास झुकावे लागले. पुनर्वसित गांधीनगर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळून दिनांक १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. गावाच्या पहिल्या सरपंच होण्याचा मान अनुसूचित जातीच्या महिलेला मिळणार आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे.

जानेवारी २०२१ मे २०२२ या

नव्याने स्थापित झालेली गांधीनगर ह्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पहिली सरपंच महिला होणार आहे व ती थेट जनतेतून निवडल्या जाणार आहे. नवनिर्वाचित गांधीनगर ह्या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ३ अर्ज आले तर सदस्य पदासाठी २१ अर्ज आले आहेत. सर्व अर्ज वैध आहेत. ज्यातून ही ग्रामपंचायत वेगळी झाली त्या सावंगी या ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ३ अर्ज तर सदस्यासाठी २३ अर्ज प्राप्त झाली आहेत. पहिल्या महिला सरपंच पदाचा मान कुणास मिळतो ते येत्या १७ ऑक्टोबरला कळणार आहे. गांधीनगर ग्रामपंचायत मध्ये एकूण १ हजार २९० मतदार आहेत. यात महिला मतदार ६३३ असून पुरुष मतदार ६५७ आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos