कोरची तालुक्यात दोन तर चामोर्शी तालुक्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
  प्रतिनिधी / गडचिरोली : 
दुषीत पाणी व संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यातील तिन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याची घटना आज २८ ऑगस्ट रोजी कोरची व चामोर्शी तालुक्यात घडली आहे.   मृतकामध्ये चामोर्शी तालुक्यातील  जि.प. हायस्कुल सोनसरी  येथील सनम दुशन कोवे (१६)  ,  व कोरची तालुक्यातील राजेश सबेरसिंग कुमरे (१३) रा.आश्रमशाळा मसेली, शिवाणी दु्रगसाय कोवाची (७)  जि.प. शाळा बोडेना ता. कोरची यांचा समावेश आहे.  प्राप्त माहितीनुसार सनम कोवे हा चामोर्शी तालुक्यातील सोनसरी येथील जि.प. हायस्कुलमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत होता.  गेल्या दोन दिवसापासून तो तापाने फणफणत होता.  त्याला उपचारासाङ्गी आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतू प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तिथे जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याचा उपपचारादरम्यान मृत्यू झाला.  सनम कोवे या विद्यार्थ्याला ब्रेन मलेरिया झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरची तालुक्यातील  मसेली आश्रमशाळेतील राजेश कुमरे या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी  कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. जेव्हा त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले तेव्हा तो शुध्दीवर नव्हता. डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीने औषधोपचार केला. परंतू  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. त्याला सर्पदंश झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. कावडकर यांनी शवविच्छेदन करून  प्रेत नातेवाईकांच्या सुपूर्द केले.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोडबोले करीत आहेत.
 तर कोरची येथून ५ किमी अंतरावरील बोडेना जिल्हा परिषद शाळेत दुसरीत शिकणारी  शिवाणी कोवाची हिला काल रात्रीच्या सुमारास हलकासा ताप आला. आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान तिला हगवण सुरू झाली.तिला दवाखाण्यात नेण्याच्या तयारीत  असतांनाच ती काही वेळातच मरण पावली. बोडेना गावात पाच विहीरी आहेत.  या विहीरीत अद्यापही ब्लिचींग पावडर टाकण्यात आले नाही. याच विहीरीचे पाणी नागरीक पितात. यामुळे दुषीत पाण्यामुळेच तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-28


Related Photos