महत्वाच्या बातम्या

 नगरपंचायत हद्दीत माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सभा मंडपाचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : स्थानिक नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

भामरागड नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये सभा मंडप बांधकाम करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून तब्बल १० लाख रुपयांची निधी उपलब्ध करून दिली होती. नुकतेच सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने येथील नागरिकांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले. लोकार्पण प्रसंगी येथील तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, राकॉचे तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, आदिवासी सेवक सब्बर बेग मोगल, राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, नगर पंचायतचे पदाधिकारी तसेच भामरागड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos