महत्वाच्या बातम्या

 आजपासून विद्यापीठ, कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी संपावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघदेखील सहभागी झाला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयात सुरू असणाऱ्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून याचा फटका मुंबई विद्यापीठांच्या विविध परीक्षांनादेखील बसणार आहे.

विद्यापीठात सध्या इंजिनीअरिंग, एमकॉम आणि एलएलबीच्या परीक्षा सुरू असून या परीक्षांशी संबंधित कोणतेही काम न करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारच्या आडमुठय़ा धोरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहेत. सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाच्या योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अभय राणे यांनी दिली.

कॉलेजना प्रश्नपत्रिकाच पाठविणार नाही 

मुंबई विद्यापीठात सध्या तब्बल २० हजार विद्यार्थी इंजिनीअरिंगच्या विविध अभ्यासक्रमांची परीक्षा देत आहेत, तर एमकॉमच्या अडीच हजार आणि एलएलबीच्या २००० विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. मात्र २ फेब्रुवारीपासून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावर पाठविणे, आवेदनपत्र तपासणे, रोल नंबर डेव्हलप करणे, न्यमोरिकल पाठविणे, ऍडमिशन कार्ड पाठविणे, पेपर सेटिंगच्या मीटिंग व तत्सम कामे न करण्याच्या सूचना सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असे होणार आंदोलन

१४ फेब्रुवारी - दुपारी २ ते २.३० वाजता निदर्शने

१५ फेब्रुवारी - काळ्या फिती लावून काम करणार

१६ फेब्रुवारी - एक दिवसाचा संप

२० फेब्रुवारी - बेमुदत बंद





  Print






News - Rajy




Related Photos