महत्वाच्या बातम्या

 अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात


- आरोपीच्या शेतातून एकूण २७ लाख २५ हजार रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत

- स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे धानोरा येथील पोलीस पथकाची संयुक्त कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रात अवैध कारवायांना आळा घालून सूरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी विशेष निर्देश पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांनी दिले आहेत. याकरीता अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध कारवाया करणार्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश देखील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीसांकडून ०६/०५/२०२६ रोजी उपविभाग धानोरा अंतर्गत येणा­या पोलीस स्टेशन, धानोरा हद्दीमध्ये मौजा परसवाडी येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे. 

सविस्तर वृत्त असे आहे की, ०४/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजा परसवाडी येथील इसम नामे मोरेश्वर हिरामण उसेंडी, वय ५८ वर्ष रा. परसवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली याने त्याचे शेतशिवारात अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे. अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक मौजा परसवाडी येथे रवाना झाले. गोपनिय माहितीमध्ये नमूद संशयीत इसम नामे मोरेश्वर हिरामण उसेंडी, वय ५८ वर्ष रा. परसवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली यांचे शेतात पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या शेताचे पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या शेतात अमली पदार्थ (गांजा) ची लहान-मोठे झाडे लागवड केलेले मिळून आले. 

सदर ठिकाणी पंचासमक्ष तपासणी केली असता, शेतात लागवड केलेला एकूण ५४.५ कि.ग्रॅ वजन असलेला कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ (गांजा) प्रति किलो ५०, हजार रुपये प्रमाणे एकुण २७ लाख २५ हजार (सत्ताविस लाख पंचविस हजार रुपये) किंमतीचा मुद्येमाल मिळुन आला. आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने आरोपी नामे मोरेश्वर  हिरामण उसेंडी, वय ५८ वर्ष रा. परसवाडी ता. आरमोरी जि. गडचिरोली याचे विरुध्द पोलीस स्टेशन, धानोरा येथे ०५/०५/२०२६ रोजी अप. क्र. ६२/२०२६, कलम ८ (क), २० (ब) (त्त्) २० (क) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये गुन्हा दाखल करुन मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस ०२ दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे धानोरा येथील पोउपनि. टेभुर्णे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण फेगडे यांचे नेतृत्वात पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा/९४३ सुधीर दंडीकेवार, पोना/५४०८ धनंजय चौधरी, पोअं/३९५१ प्रशांत गरफडे, पोअं/४२० रोहित गोंगले, चालक पोअं/८०९२ संदीप भेंडारे तसेच पोस्टे धानोराचे सपोनि. प्रशांत जंगले व अंमलदार यांनी पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos