आठ ते दहा हजार तरूणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ


- गडचिरोली पोलिस दलाचा उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाने २ जानेवारी ते ८  जानेवारी या कालावधीत रेझींग डे च्या माध्यमातुन विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्याचाच भाग म्हणुन गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील विविध पोलीस ठाणे/उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्र स्तरावर व्यसनमुक्ती संकल्प रॅली व शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
जिल्ह्यातील आठ ते दहा हजार युवकांनी या कार्यक्रमात सहभागी होत व्यसनमुक्तीची शपथ घेतली.   गडचिरोली जिल्हयात ५५ ठिकाणी व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  रॅली संपल्यानंतर गावातील मुख्य ठिकाणी येवून सहभागी झालेल्या ८ ते १० हजार तरुणांनी व्यसनापासुन दुर राहण्याची शपथ घेतली. तसेच या दरम्यान गुटखा, तंबाखु, खर्रा अशा तंबाखुजन्य पदार्थाची होळी करण्यात आली. यावेळी गावातील पानठेले धारकांनीसुध्दा आपले पानठेले बंद ठेवले होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-07


Related Photos