महत्वाच्या बातम्या

 गावपातळीवर क्रिकेट खेळ खेळून यशोशिखर गाठावे : माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार


- माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील कोठी येथील स्वीट चॉईस क्रिकेट क्लब कोठी म. (हालेवार) यांचे सौजन्याने भव्य रबरी बॉल ग्रामीण क्रिकेट सामने आयोजन केली आहे. या क्रिकेट स्पर्धेचे आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे सहउद्घाटक सेवानिवृत्त सहाय्यक वनरक्षक तथा कॉग्रेसचे नेते हनुमंतु मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून संध्या कन्नमवार उपसरपंच हालेवारा, प्रज्वल नागुलवार सचिव आविस तथा भारतीय काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष होते.

सदर हा क्रिकेट सामन्याचे स्पर्धेसाठी माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक गणेश दासरवार, नंदु मटामी आविस तालुका अध्यक्ष तथा महा. ग्रामसभा अध्यक्ष तालुका एटापल्ली, प्रज्वल नागुलवार सचिव आविस तथा भारतीय काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष यांच्या कडून देण्यात येत आहे. तर तृतीय पारितोषिक संध्या कन्नमवार उपसरपंच हालेवारा, सुरेश मट्टामी हालेवारा, सैनू मट्टामी हालेवारा देण्यात येत आहे.

यावेळी कार्यक्रमाला लिंगाजी किरंगा पोलीस पाटील, सुधाकर गोटा तोडसा इलकापट्टी अध्यक्ष, लालसू नरोटे सरपंच, नितेश नरोटे माजी उपसभापती, अनिल करमरकर कृषिउत्पन्न बाजार समिती संचालक, चंदू हीचामी आ.वि.का. संस्था कोटमी, सुरेश मटामी पो.पा. हालेवारा, निजान पेंदाम नगरसेवक एटापल्ली, चंदु किरंगा भूमिया कोटी, बाबुराव नरोटे, अशोक येलमुले माजी उपसरपंच, मधुकर गोटा पो.पा., सुकृ मडावी आ.वि.का. संस्था कोटमी, मंदा गेडाम, सैनू मटामी, अभिजित दासरवार, साईनाथ मडावी, प्रकाश मटामी, रवींद्र वेंगोंडावार चमरू किरंगा आ.वि.का, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, नरेश गर्गाम, सचिन पंचार्या, प्रमोद गोडसेलवार सह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक- मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos