महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला (Maharashtra Chitrarath 2023) दुसरा क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. तर उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला. 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. 

साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर यावर अधारित चित्ररथ होता. या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. गोंधळींचे जे प्रमुख वाद्य आहे संबळ हे या ठिकाणी दाखवलेले आहे. हे सगळे तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर आहेत. त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला आहे. ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय. पोतराजसुद्धा चित्ररथाच्या होते.  एकूणच महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर करण्यात आली होती. 

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि (Nashik) वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन कर्तव्यपथापवर झालं.  

पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात. महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी साडेतीन शक्तिपीठे स्त्रीशक्ती जागर या संकल्पनेची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. प्रजासत्ताकदिनी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती या चित्ररथात करण्यात आली होती.





  Print






News - Rajy




Related Photos