धक्कादायक : सलाईनमध्ये आढळले झुरळ, रुग्णाच्या जीवाशी खेळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथळ्या डॉ. जगदाळे मामा या रूग्णालयात सलाईनमध्ये झुरळ आढळल्याचे समोर आले आहे.
सोलापूरच्या डॉ. जगदाळे मामा रूग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रूग्णालयातील सलाईनमध्ये चक्क झुरळ सापडले. या रूग्णालयात निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रूग्णालयात या मुलीला लावण्यात आलेले सलाईन सातत्याने बंद पडत होते. सलाईन तपासल्यानंतर त्यांना या सलाईनमध्ये चक्क झुरळ असल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे वेळेवर सलाईन बंद केल्यामुळे रुग्णाच्या जीवाला होणारा धोका टळला. दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे विचारपूस केली असता उडवाडावीची उत्तर दिली जात आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या चिमुकलीची तब्येत आता बरी असून तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
News - Rajy | Posted : 2021-09-03