वन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी, डुकरांची शिकार करतांना चुकून लागली बंदुकीची गोळी


- वर्धा जिल्ह्यातील परतोड येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी /  वर्धा :
वन्यप्राण्यांची  शिकार करण्यासाठी आलेल्या शिकारीत चुकून शेतकऱ्याला बंदुकीची गोळी थेट  लागल्याने एका शेतकऱ्याचा  जागीच मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्या.पोलीस ठाण्याच्या हद्दीत परतोड टाकरखेड फाट्यावर आज शनिवार दुपारी ३ वाजता घडली.  
गोवर्धन महादेव डोबळे (५५) रा.परतोड असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून यात तिन आरोपींना पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. 
   नेहमी प्रमाणे आपल्या गावातुन शेतात फेरफटका मारण्यासाठी मृतक शेतकरी गेले होते . या ठिकाणी रानटी डुकरांची शिकार करण्यासाठी तळेगाव श्यामजीपंत येथील शीख समुदायातील लोक आले होते . या ठिकाणी डुकरांचा मोठा कळप जात होता.  मात्र नेम धरून बसलेल्या शीकाऱ्यांनी बारदच्या बंदुकीची गोळी झाडली . यात उभ्या असलेल्या गोवर्धन डोबळे यांच्या डोक्यात गोळी गेली.  यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  याठिकाणी असलेल्या शिकाऱ्यांनी घटनास्थळा वरून पळ काढत तळेगाव पोलीस ठाण्यात   आत्मसमर्पण केले.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.   Print


News - Wardha | Posted : 2018-12-08


Related Photos