घरगुती वादातून मातेनेच दोन चिमुकल्यांना हौदात बुडवून मारले


वृत्तसंस्था / बीड : घरातील वाद आणि चारित्र्यावर पती संशय घेत असल्याने तणावात असलेल्या  महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलींना घरातील हौदात बुडवून मारले .  ही घटना बीड शहरातील नरसोबानगर भगत मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दीपाली राधेश्याम आमटे (२३) असे महिलेचे नाव आहे. 
सोमवारी घरातील सर्व व्यक्ती बाहेर गेले होते तर पती हा रिक्षा घेऊन बाहेर गेला होता, रात्री घरी आल्यावर राधेश्याम ला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत त्यांनी शोध घेतला मात्र त्या दिसून आल्या नाहीत, अखेर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आणि घरी आला.
आज सकाळी पाणी घेताना हा प्रकार उघडकीस आला, तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी भेट दिली, निर्दयी मातेला अटक करण्यात आली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-30


Related Photos