महत्वाच्या बातम्या

 मानसेवी डॉक्टरांना स्थायी करण्यात अडचण काय?


- विस वर्षापासून २८१ डॉक्टराचा शासनाला प्रश्न 

- यातील ४९ मानसेवी वैधकिय अधिकारी गडचिरोलीत कार्यरत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : राज्याच्या आदिवासी जिल्ह्यातील भरारी पथकातील माणसेवी वैद्यकीय अधिकारी आज नाहीतर उद्या स्थायी होऊ म्हणून दिवस रात्र कमी मानधनावर राज्यातील आदिवासी बहुलभागात गडचिरोली सारख्या नक्सलग्रस्त भागात आरोग्य सेवा देत आहेत. असे असतानाही मागील पंधरा वर्षापासून ते समायोजनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाला राज्यातील केवळ २८१ डॉक्टरांना नियमित करण्यात अडचण काय ? असा प्रश्न राज्यातील भरारी पथकातील आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यात नवसंजीवनी योजनेअंतर्गत माणसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. ज्या ठिकाणी रस्ते, वीज नाही, नदी नाले ओलांडून आदिवासी बांधवांना आरोग्यसेवा माणसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत गेल्या पंधरा वर्षापासून देण्यात येत आहे. अतिदुर्गम आदिवासी भागात कोरोना कालावधीत घरी जाऊन गरोदर माता सौ. रामेश्वरी तोप्पा रा. खंडी याची तपासणी करताना मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत आरोग्य सेवेचे मोलाचे योगदान दिलेले आहे. सोबतच मानसेवी वैद्यकीय अधिकारी हे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करतात व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करीत असतात. विशेष म्हणजे  बाल तथा मातामृत्यू कमी करण्यात या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सिंहाचा वाटा आहे. असे असतानाही या डॉक्टरांना मागील पंधरा वर्षापासून स्थायी करण्यास टाळाटाळ केली जात आहे आरोग्य विभागात डॉक्टरांच्या रिक्त जागा आहेत आणि त्याचा ताणही आरोग्यसेवेवर पडताना दिसत असताना मानसेवी डॉक्टरांची संख्या २८१ आहे. तरीसुद्धा आरोग्य विभागाचे अधिकारी त्यांनी समायोजन करण्यासाठी विलंब न करता त्यांचे रिक्त पदावर समायोजन करावे अशी मागणी मानसेवी वैद्यकीय अधिकारी करीत आहेत.

गडचिरोली  सारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील  भागात आरोग्य सेवा पुरविणे हे नेहमीच आव्हानात्मक ठरते. कोरोना काळातही मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत आरोग्य सेवेचे मोलाचे योगदान दिलेले आहे. तसेच एक मानसेवी डॅाक्टर सहकार्याचे अपघातात निधन झाले परंतु कंत्राटी पदावर कार्यरत असल्याने शासनाकडून त्यांच्या परिवारास कुठलेही आर्थिक मदत मिळाली नाही. २०१९-२० मधे तत्कालीन आरोग्य मंत्री यांचे दालनात मानसेवी डॉक्टरांचे समायोजन करण्याकरिता त्या विषयीची माहितीही १६ जिल्हा स्तरावरुन वारंवार मागविण्यात आली, परंतु त्यांवर कुठलाही शिक्कामोर्तब झालेला नाही. तरी सद्यस्थित आरोग्य मंत्री महोदयांनी यांनी आमच्या आयुष्याच्या १०-१५ वर्षाच्या सेवेचा विचार करावा व सकारात्मक निर्णय घेवुन आमचे बिएएमएस गट ब रिक्त पदावर समायोजन करावे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos