महत्वाच्या बातम्या

 जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन


- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा या सायकल रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांसह १५० हून अधिक पोलीस अधिकारी/अंमलदार, जेष्ठ नागरिक व विद्याथ्र्यांचा उत्स्फुर्त सहभाग

- निरोगी जीवन आणि निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने सायकलचा अधिकाधिक वापर करावा पोलीस अधीक्षक  एम. रमेश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : संयुक्त राष्ट्रसंघाने सन -२०१८ पासून ०३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केलेला आहे. तेव्हा पासून ०३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. सायकल ही स्वस्त, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल असे शाश्वत वाहतुकीचे प्रभावी साधन असून नेहमीच सायकल चालविल्याने शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

नागरिकांमध्ये आरोग्य स्वास्थ्य विषयक जागरुकता निर्माण व्हावी व अधिकाधिक लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर करावा हा संदेश देण्यासाठी जागतिक सायकल दिनाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  

आज ०३ जून २०२६ रोजी सकाळी ०७.०० वा. पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते इंदिरा गांधी चौकपर्यंंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येऊन सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली सुहास गाडे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, जेष्ठ नागरिक व शालेय विद्याथ्र्यांनी सायकल रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सायकल रॅलीचा समारोप शहिद पांडु आलाम सभागृह येथे करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान सहभागींना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येऊन सर्व सहभागींचे कौतूक करण्यात आले.  

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, नियमित सायकल चालविल्यामूळे आरोग्य सुधारण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही मोठी मदत होते. बदलत्या परिस्थितीनूसार आणि शासनाच्या आवाहनाला प्रतीसाद देत आपण सर्वांनी किमान एक दिवस सायकलचा वापर करावा. यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास, मानसिक आरोग्य सुधारण्यास तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच यावेळी पोलीस अधीक्षकांनी उपस्थितांना सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करत जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.    

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोलीएम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच विशेष अभियान पथक व सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.          

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos