महत्वाच्या बातम्या

 मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत वनविभागाकडून आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता उपाययोजना करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त यांच्या दालनात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड चंद्रपूर, वणी व माजरी क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, तसेच डब्लू. सी. एल व वनाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता डब्ल्यू. सी. एल.च्या अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील अनावश्यक झाडे-झुडपे साफ सफाई करणे, माईस परिसरात चेनलिंग फेन्सींग करणे, वसाहत परिसरातील तुटलेल्या संरक्षण भिंतींची डागडुजी करणे तसेच सुरक्षारक्षक यांच्याद्वारे नियमित गस्त घालणे आदीबाबत सविस्तर चर्चा करून यासंबंधीचे आदेश निर्गमित करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos