महत्वाच्या बातम्या

 महाकाली यात्रेतील यात्रेकरुंच्या निवासाची सभागृह व मंगल कार्यालय येथे व्यवस्था करा : आ. किशोर जोरगेवार


- जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महाकाली यात्रेसाठी लाखो भाविक चंद्रपूरात दाखल झाले आहे. मात्र येथे वादळी पाउस सुरु असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता मंदिर परिसरातील सभागृह, मंगल कार्यालये यात्रेकरुंसाठी मोकडे करुन तेथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना केल्या आहे.

चैत्र महिण्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेला सुरवात झाली असुन यात्रा अंतिम टप्यात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यासह राज्या बाहेरील लाखो भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात दाखल झाले आहे. यावेळी प्रशासनाच्या वतीने यात्रा परिसरात यात्रेकरुंची सोय करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या श्रध्दाळुंसाठी प्रशासनाच्या वतीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील व्यवस्थेची पाहणी सुध्दा केली आहे.

दरम्यान आज चंद्रपूरात वादळी पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे यात्रेकरुंसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना मंदिर परिसरातील सभागृहे आणि मंगल कार्यालय यात्रेकरुंसाठी मोकडे करत येथे त्यांच्या निवासाची सोय करण्याच्या सुचना केल्या आहेत. सोबतच वातावरणातील बदलामुळे अनेक श्रध्दाळुंची प्रकृती खराब झाली आहे. त्यामुळे येथील रुग्णालय २४ तास पुर्ण क्षमतेने सुरु ठेवत येथे पुर्ण डॉक्टर उपलब्ध ठेवण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. यात्रेकरुंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी प्रशासनाला केल्या आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos