महत्वाच्या बातम्या

 देशातील नामांकित कंपनी असलेल्या सोलार कंपनीचा डाटा चोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : देशातील नामांकित कंपनी असलेल्या सोलार इंडस्ट्रीज कंपनीचा महत्त्वपूर्ण डाटा सायबर हॅकरने हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीद्वारे सायबर सेलकडे गुन्हा दाखल केला असून आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) देण्यात आल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदासपेठ येथे सोलार इंडस्ट्रीज कंपनीचे कार्यालय आहे. याशिवाय बाजारगाव परिसरात त्यांचे उत्पादन तयार करण्याचा कारखाना आहे. कंपनीद्वारे शस्त्र, एक्स्पोसिव्ह यासह विविध क्षेत्रातील उत्पादने तयार करण्याचे काम केले जाते. त्यातूनच कंपनीचे देशाच्या संरक्षण विभागाशी अनेक महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी कंपनीच्या रामदासपेठ येथील कार्यालयात सायबर हॅकरद्वारे सोलार कंपनीचा डाटा चोरी त्यांचे संकेतस्थळ हॅक केल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय त्यातून २ टीबी डाटा चोरल्याची माहिती दिली. सोबतच त्यांना एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगण्यात आले. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे ती लिंक ओपन न केल्यामुळे हॅकरच्या माध्यमातून प्रोटोन मेल पाठविण्यात आला. त्यात ७२ तासात मेलमध्ये दिलेल्या सर्व सूचना मान्य करण्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सायबर सेलकडे २१ जानेवारीला तक्रार नोंदविली. सायबर सेलने त्याबाबत तपास केला असता, हॅकरद्वारे कंपनीचा डाटा चोरल्याचे समोर आले. त्यातून सेलद्वारे आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

कंपनीकडून डाटा चोरल्याची तक्रार येताच, सायबर सेलने आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. मात्र, प्रकरण संरक्षण खात्याशी निगडीत असल्याने पोलिसांकडून राज्य सरकारला याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यातून हा तपास केंद्रीय गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यातून या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) देण्यात आला आहे. याशिवाय पुढे एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे.

सोलार इंडस्ट्रीज कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून त्यातून सायबर हॅकरने जवळपास ९० एमबी डाटा चोरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कंपनीद्वारे ५० एमबी डाटा चोरण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश डाटा कंपनीद्वारे पुन्हा मिळविण्यात आला असल्याचेही समजते. मात्र, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे दिसून येते.





  Print






News - Nagpur




Related Photos