भामरागड येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
- माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी भामरागड तालुका मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली हळदी- कुंकू कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात मनोरंजनात्मक खेळ व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
यावेळी आयोजित विविध स्पर्धां मधील विजेत्या महिलांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांकडून एकमेकांना हळदी कुंकूचा वाण देण्यात आला. लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणी बक्षीस देण्यात आले. तर काही महिलांना लकी ड्रॉ द्वारे चांदीचे नाणे आणि पैठणी देण्यात आले. विशेष म्हणजे विधवा स्त्रियांचा देखील हळदीकुंकू आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी, मुलचेरा, एटापल्ली आणि सिरोंचा नंतर भामरागड तालुक्यात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले. पाचही तालुक्यात शेकडो महिलांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती.
News - Gadchiroli