माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे दिग्गज नेते एम्समध्ये पोहोचले आहेत.
९३ वर्षीय वाजपेयी हे ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येते. बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स’ गाठले आणि वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी ५० मिनिटे रुग्णालयात होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, खासदार मीनाक्षी लेखीही रुग्णालयात पोहोचल्या.
गुरुवारी सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर काही वेळातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेदेखील रुग्णालयात पोहोचले.  Print


News - World | Posted : 2018-08-16


Related Photos