सिंदेवाहीत महाआरोग्य शिबिरात ५२४ रुग्णांची मोफत तपासणी


- आरोग्य सेवेतून जोपासली सामाजिक बांधिलकी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सामाजिक दायित्व व आरोग्य सेवेची जोड देत स्व. वासुदेवराव रं. इरटवार यांच्या ११व्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार ३० आगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महा आरोग्य निदान व मोफत उपचार शिबिराला सिंदेवाही तालुका व परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इरटवार परिवार, सिंदेवाही आणि दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तब्बल ५२४ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.स्थानिक सर्वोदय महाविद्यालय (सिनियर कॉलेज) जाटलापूर रोड सिंदेवाही येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र जैस्वाल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने पार पडले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सतीश चिंतावार उपस्थित होते. तसेच सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भाष्करभाऊ नन्नावार, अरविंदजी जैस्वाल, बाबुरावजी परसावार, डॉ. बदनोरे, नानाजी शिंगणे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिरात नागपूर व सावंगी येथील विविध आजारां वरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली व आवश्यक औषधोपचार पुरवले त्यामध्ये अस्थिरोग विभाग १३० रुग्ण संधिवात, मणक्यातील गॅप, हाडांचे आजार) जनरल मेडिसिन १२१ रुग्ण (रक्तदाब, मधुमेह, ताप, हृदयरोग) नेत्ररोग विभाग १०६ रुग्ण (मोतीबिंदू, तिरळेपणा, डोळ्यांचे आजार) न्यूरोलॉजी / मज्जारोग ५१ रुग्ण (मेंदू व मणका संबंधित आजार) जनरल सर्जरी ५१ रुग्ण (हर्निया, हायड्रोसील, अंगावरील गाठी, मुतखडा) प्रसूती व स्त्रीरोग २० रुग्ण (महिलांचे आजार) नाक-कान-घसा १८ रुग्ण त्वचारोग विभाग १५ रुग्ण बालरोग विभाग १२ रुग्ण (कुपोषण, मतिमंदत्व, बालरोग)तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना पुढील गंभीर उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली, अशा १०६ रुग्णांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे.
नेत्ररोग (मोतीबिंदू/शस्त्रक्रिया)२८
जनरल सर्जरी (हर्निया/गाठी/मुतखडा)२३
न्यूरोलॉजी (मेंदू व मणका विकार)१९
अस्थिरोग (सांधेरोपण/फॅक्चर/गॅप)१०
प्रसूती व स्त्रीरोग ५
हृदयरोग विभाग ३
नाक-कान-घसा (ENT)३
बालरोग व जनरल मेडिसिन४ (बालरोग २, मेडिसिन २)
मानसशास्त्र विभाग १ -
संदर्भित रुग्णांच्या पुढील उपचारासाठी रुग्णालयातील ओ पी डी बॅचचे वेळापत्रक ३१ ऑगस्ट २०२६ आणि २ सप्टेंबर २०२६ असे निश्चित करण्यात आले आहे. या रुग्णांसाठी येण्या-जाण्याची बस व्यवस्था, राहणे, भोजन, ईसीजी, सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत राहणार आहेत. ३२ ईसीजी (ECG) आणि ३६ रँडम ब्लड शुगर (RBS) चाचण्या करण्यात आल्या.
PMJY अंतर्गत १६ नवीन नोंदणी करण्यात आली, तर १० कुटुंबांना कौटुंबिक आरोग्य कार्ड (कुटुंब कार्ड) तात्काळ तयार करून देण्यात आले.या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संदीपजी इरटवार, पराग इरटवार, सुशांत इरटवार व समस्त इरटवार परिवार यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच शिबिर नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी अभिजित मुप्पीडवार, किशोर भरडकर, अस्लम शेख, विलास मोगरे आणि हितेश सूचक यांनी परिश्रम घेतले.स्व. वासुदेवराव रं. इरटवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त केवळ पुष्पहार अर्पण न करता ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा उपक्रम राबवल्याबद्दल सिंदेवाही व परिसरातून इरटवार परिवाराचे कौतुक होत आहे.




Petrol Price




