असरअल्ली वनपरीक्षेत्रात वनतस्करास अटक, सागवानी लठ्ठे जप्त: तस्करांनी केला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अंकीसा
: सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली वनरीक्षेत्रातील बोत्तामडगू येथे सागवान तस्करी करतांना कारवाई करण्यात आली असून एका सागवान तस्करास अटक करण्यात आली आहे तर इतर तस्कर फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. आरोपीकडून २५ हजारांचे सागवान जप्त करण्यात आले आहे.
सोनु सुरेश सिडाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. असरअल्ली वनपरीक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सागवान तस्करी होत असल्याची माहिती मिळताच ७ आॅगस्ट रोजी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण , उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी चेतन पाटील यांच्या नेतृत्वात वनरक्षक इरकीवार, कोठारे, ताराम, उईके, कन्नाके तसेच इतर मजूरांनी बोत्तागुडम येथे धाड टाकली. सकाळी ६.३०  वाजताच्या सुमारास सागवान तस्करांवर कारवाई सुरू केली. सागवान तस्कर पाण्यातून लठ्ठे नेत असताना कर्मचाऱ्यांनी बोटीने जावून तस्करास अटक केली. यावेळी इतर तस्करांनी वनकर्मचाऱ्यांनी दगड भिरकावून हल्ला केला. यावेळी कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव पाहून तस्कर पळून गेले. तर सोनु सिडाम याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३३ लठ्ठे जप्त करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास वनपरीमंडळ अधिकारी श्रीकांत नवघरे करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-10


Related Photos