५ लाख ८५ हजारांचा अवैध दारूसाठा जप्त : दोघांना अटक


- गडचिरोली पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून अवैध दारू तस्करावर गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे सापळा कारवाई करत चारचाकी वाहनासह 5 लाख 85 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक अमर रामटेके (24) रा. पाहरणी ता. नागभीड जि. चंद्रपूर, शेखर तफन सरकार (20) रा. गौरनगर ता. अर्जुनी जि. गोंदिया असे अरोपींचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी येथे दारूचा पुरवठा करण्यासाठी आरमोरी ते गडचिरोली मार्गे चारचाकी वाहनातून अज्ञात इसम जात असल्याचय गोपनीय माहितीवरून पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोल यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकरी पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार व पथक यांनी आरमोरी ते गडचिरोली मार्गावर विविध ठिकाणी गोवनियरित्या सापळा रचुन अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या वाहनावर पाळत ठेवली. अवैधरित्या दारूची वाहतुक करीत असलेले वाहन गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे पोहचताच वाहनाची झडती घेवुन अवैध दारू वाहतुक करीत असल्याची खात्री करून चारचाकी वाहन क्र एमएच 01 एव्ही 2848 यामधून 85 हजार 200 रूपयांचा देशी दारूसाठा व चारचाकी वाहन अंदाज किंमत 5 लाख रूपये असा एकुण 5 लाख 85 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन्ही आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गडचिरोली जिल्हयात दारूबंदि असतांनाही मोठया प्रमाणात भंडारा, गोंदिया जिल्हयातून तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा व छत्तीसगड राज्यातून दारूची चोरटया मार्गाने आयात करून अवैध दारूविक्रेत्यांना पोहचवून देण्यात येत असल्याचे आढळून आले असून अवैध दारूचा पुरवठा करणाऱ्या इसमांच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले आहे. सदर कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सदर कारवाई प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले, पोहवा आत्माराम गोन्नाडे, पोहवा रमेश उसेंडी, पोहवा चंद्रभान मडावी, पोहवा शिवदास दुर्ग, मपोशी शिला कुकुडकर, मपोशी वनिता धुर्वे यांनी केली असून पोलिस अधिक्षक अंकित गोयल पथकाचे कौतुक केले असुन अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यवसायिकाविरूध्द कठोर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुढील तपास गडचिरोली पोलिस दल करीत आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-03-03


Related Photos