महत्वाच्या बातम्या

 ५ टक्के राखीव निधी अंतर्गत दिव्यांगांना धनादेश वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांकरिता दरवर्षी नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. हा निधी दरवर्षी अर्धवार्षिक स्वरुपात दिव्यांग बांधवांना वितरीत करण्यात येतो. यंदा आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांगांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षात नगर परिषदेमार्फत दिव्यांग बांधवांकरिता ५ टक्के निधी म्हणजे ४,६,८,१०० रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. या निधीअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय खर्च व उदरनिर्वाहाकरिता एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीचा अर्धवार्षिक हप्त्याचे निधी वितरण करण्यात आले. हा निधी १६७ लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस / एनइएफटीद्वारे वितरीत करण्यात येत प्रमुख अतिथी म्हणून न. प. चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, कार्यालय अधीक्षक महेश गेडाम, पाणीपुरवठा अभियंता आशिष गेडाम उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे यांनी केले. यानंतर सुध्दा दिव्यांग बांधवांचे अर्ज स्वीकृत करण्यात येतील, असे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी सांगितले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos